‘ओम शांती ओम’, गाण्यावर अंबानी कुटुंबाचा जबरदस्त डान्स!

    06-Jul-2024
Total Views |
 
ambani
 
 
 
मुंबई : मुकेश आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी राधिका मर्चंट सोबत १२ जूलै रोजी लग्नगाठ बांधणार आहे. त्यापुर्वी प्री-वेडिंग कार्यक्रमांना सुरुवात झाली असून शुक्रवार दिनांक ५ जुलै रोजी संगीत सोहळा झाला. या सोहळ्याला कलाकार मंडळींनी उपस्थिती लावली होती. तसेच, या सोहळ्यात संपुर्ण अंबानी कुटुंबीयांनी विशेष डान्स परफॉर्मन्स केला.
 
‘ओम शांती ओम’
या शाहरुख खानवर चित्रित झालेल्या गाण्यावर मुकेश, नीता, आकाश, श्लोका, राधिका, अनंत या सगळ्यांनी उत्तम डान्स केला. या गाण्यात जसे सर्व सेलिब्रिटी डान्स करतात, त्याप्रमाणे सोहळ्याला उपस्थित असणारा कलाकारांसाठी अंबानी कुटुंबियांनी हा विशेष डान्स केला होता.
 
दरम्यान, येत्या १२ जुलैला ही अनंत-राधिका विवाहबंधनात अडकून आयुष्याच्या एका नव्या प्रवासाची सुरुवात करणार आहेत. १४ जुलैपर्यंत लग्नाचे सगळे विधी पार पडणार असून या लग्नासाठी खास देश-विदेशातील पाहुणे उपस्थित राहणार आहेत. लग्नाच्या पाहुण्यांच्या यादीत शाहरुख खान-सलमान खान, बच्चन कुटुंब, विराट कोहली-अनुष्का शर्मा, विकी कौशल, कतरिना कैफसह अनेक बड्या स्टार्सची नावे आहेत. याशिवाय परदेशाताली बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग, लॅरी फिंक, स्टीफन श्वार्झमन, बॉब इगर, इवांका ट्रम्प यांच्यासह बरेच परदेशी पाहुणे देखील हजर राहण्याची शक्यता आहे.