आषाढी वारीसाठी ६४ विशेष रेल्वेगाड्या

मध्य रेल्वे पंढरपूर/मिरजसाठी विशेष गाड्या चालवणार

    06-Jul-2024
Total Views |

पंढरपूर
मुंबई : पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी यात्रेला येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे पंढरपूर व मिरजसाठी ६४ आषाढी विशेष गाड्या चालवणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. नागपूर - मिरज विशेष (२ सेवा), नागपूर - मिरज विशेष (२ सेवा), नवी अमरावती - पंढरपूर विशेष (४ सेवा), खामगाव - पंढरपूर विशेष (४ सेवा), लातूर - पंढरपूर (१० सेवा), भुसावळ - पंढरपूर अनारक्षित विशेष (२ सेवा), मिरज - पंढरपूर अनारक्षित मेमू विशेष (२० सेवा), मिरज - कुर्डूवाडी अनारक्षित मेमू विशेष (२० सेवा) या सेवांचा यात समावेश आहे.
 
नागपूर - मिरज विशेष (२ सेवा) गाडी क्रमांक ०१२०५ विशेष १४ रोजी नागपूर येथून ०८.५० वाजता सुटेल आणि मिरज येथे दुसऱ्या दिवशी ११.५५ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१२०६ विशेष १८ रोजी मिरज येथून १२.५५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी १२.२५ वाजता पोहोचेल. नागपूर - मिरज विशेष (२ सेवा) गाडी क्रमांक ०१२०७ विशेष गाडी १५ रोजी नागपूर येथून ०८.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ११.५५ वाजता मिरज येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०१२०८ विशेष गाडी १९ रोजी मिरज येथून १२.५५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी १२.२५ वाजता पोहोचेल.
 
नवी अमरावती - पंढरपूर विशेष (४ सेवा) सेवा चालविल्या जातील. गाडी क्रमांक 01119 विशेष गाडी नवी अमरावती येथून दि. १३ रोजी आणि दि. १६ रोजी (२ सेवा) रोजी दुपारी २.४० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ०९.१० वाजता पोहोचेल. तर गाडी क्रमांक ०११२० विशेष पंढरपूर येथून दि. १४ रोजी आणि दि. १७ रोजी (२ सेवा) रोजी सायंकाळी ७ .३० वाजता सुटेल आणि नवी अमरावती येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १२.४० वाजता पोहोचेल.
खामगाव - पंढरपूर विशेष (४ सेवा)
 
गाडी क्रमांक 01121 विशेष खामगाव दि. १४ आणि १७ (२ सेवा) रोजी सकाळी ११.३० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ०३.३० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 01122 विशेष पंढरपूर येथून दि. १५ आणि १८ (२ सेवा) रोजी सकाळी ०५.०० वाजता सुटेल आणि खामगाव येथे त्याच दिवशी सायंकाळी ७.३० वाजता पोहोचेल.
 
लातूर - पंढरपूर (१० सेवा) गाडी क्रमांक ०११०१ स्पेशल लातूर येथून दि. १२, १५, १६, १७ आणि १९ (५ सेवा) ला ०७.३० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे त्याच दिवशी १२.५० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०११०२ विशेष पंढरपूर येथून दि. १२. १५, १६, १७ आणि १९ (५ सेवा) रोजी १३.५० वाजता सुटेल आणि लातूर येथे त्याच दिवशी १९.२० वाजता पोहोचेल. भुसावळ - पंढरपूर अनारक्षित विशेष (२ सेवा)
 
गाडी क्रमांक ०११५९ अनारक्षित विशेष भुसावळ येथून दि. १६ रोजी १३.३० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी ३.३० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०११६० अनारक्षित विशेष पंढरपूर येथून दि. १७ रोजी २२.३० वाजता सुटेल आणि भुसावळ येथे दुसऱ्या दिवशी १३.०० वाजता पोहोचेल. मिरज - पंढरपूर अनारक्षित मेमू विशेष (२० सेवा) गाडी क्रमांक ०११०७ मेमू विशेष मिरज येथून दि. १२ ते २१ (१० सेवा) ५.०० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे त्याच दिवशी ०७.४० वाजता पोहोचेल.
 
गाडी क्रमांक ०११०८ मेमू विशेष पंढरपूर येथून दि. १२ ते २१ (१० सेवा) दरम्यान ०९.५० वाजता सुटेल आणि मिरज येथे त्याच दिवशी १.५० वाजता पोहोचेल. ही गाडी अरग, बेळंकी, सलगरे, कवठे महांकाळ, लंगरपेठ, ढालगाव, जत रोड, म्हसोबा डोंगरगाव, जावळे, वासूद आणि सांगोला याठिकाणी थांबेल. मिरज - कुर्डूवाडी दरम्यान २० अनारक्षित मेमू
 
मिरज - कुर्डूवाडी दरम्यान २० अनारक्षित मेमू विशेष सेवा चालविण्यात येतील. गाडी क्रमांक ०१२०९ मेमू विशेष मिरज येथून दि. १२ ते २१ (१० सेवा) पर्यंत दुपारी ३.१० वाजता सुटेल आणि कुर्डुवाडी येथे त्याच दिवशी ७.०० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१२१० मेमू विशेष कुर्डुवाडी येथून दि. १२ ते २१ (१० सेवा) पर्यंत रात्री ९.२५ वाजता सुटेल आणि मिरज येथे दुसऱ्या दिवशी दुपारी ०१.०० वाजता पोहोचेल.