श्वेता शिंदेच्या घरी झालेल्या चोरीचा शोध, तब्बल साडेतेरा लाखांचे दागिने जप्त

    05-Jul-2024
Total Views |
 
shweta shinde
 
 
सातारा: अभिनेत्री-दिग्दर्शिका श्वेता शिंदे हिच्या साताऱ्यातील घरी ३ जून २०२४ रोजी चोरी झाली होती. त्या चोरीचा छडा लालण्यात सातारा पोलिसांना यश आले. या चोरट्याकडून पोलिसांनी १३ लाख ३१ हजारांचे १८ तोळे वजनाचे सोन्याचांदीचे दागिने जप्त केले आहेत. दरम्यान, ज्यावेळी चोरी झाली तेव्हा घरात कुणी नसल्याचे श्वेताने पोलिसांना सांगितले होते. त्या नुसार दाखल केलेल्या तक्रारीचा तपास पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना तपास करण्याचे आदेश दिला होता.
 
श्वेताच्या घरातील खिडकीचे गज कापून अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटामध्ये ठेवलेले सुमारे ३ लाख ८२ हजारांचे दागिने लंपास केले होते. याप्रकरणी पोलीस अभिलेखावरील राजकुमार उर्फ राजु ओंकारप्पा आपचे ( कोथळी ता. उमरगा, धाराशिव) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सातारा, भुईंज, लोणंद असे तीन घरफोडीचे गुन्हे केल्याचे सांगितल्याने त्याच्याकडून १३ लाख ३१ हजारांचे दागिने व दुचाकी देखील जप्त केली. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, रोहित फार्णे व उपनिरीक्षक अमित पाटील यांनी व अंमलदार यांनी ही महत्वपुर्ण कारवाई केली आहे.