मराठी अभिनेत्रीचं आहे ‘Kalki 2898 AD’ चित्रपट आणि कमल हासन यांच्यासोबत खास कनेक्शन!

    05-Jul-2024
Total Views |
 
Kalki 2898 AD
 
 
मुंबई : नाग अश्विन दिग्दर्शित कल्की २८९८ एडी हा चित्रपट सध्या तुफान गाजत आहे. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने ७०० कोटींचा टप्पा पार केला आहे. अमिताभ बच्चन, कमल हासन, दीपिका पदुकोण, प्रभास अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाशी मराठमोळी अभिनेत्री नेळा शितोळे हिचं खास कनेक्शन आहे. या चित्रपटासाठी काय योगदान आहे जाणून घेऊयात…
 
‘कल्की २८९८ एडी’ चित्रपटात दमदार कलाकारांच्या यादीतमराठी चित्रपट, नाटक, मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये ठसा उमटवणारी नेहा उत्तम लेखिका देखील आहे. या आधी अनेक दाक्षिणात्य चित्रपटांच्या हिंदी डबच्या लिखाणासाठी तिने काम केलं आहे. तर सांगायचा मुद्दा हा की ‘कल्की २८९८ एडी’ चित्रपटाच्या हिंदी डबचा लहानसा क्लायमॅक्स सीन नेहा शितोळेने लिहिला आहे. याबद्दल तिने स्वत: पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
 
Kalki 2898 AD
 
 
नेहाने पोस्ट करत लिहिले आहे की. “‘कल्की २८९८ एडी’ चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनचा शेवट मी लिहिलेल्या काही वाक्यांनी होतो. जेव्हा आपण लिहिलेले शब्द कमल हासन सरांच्या तोंडून ऐकायला मिळतात तेव्हा खरंच खूप भारी वाटतं. या भव्य चित्रपटाचा लहानसा भाग मला होता आलं यासाठी मी प्रचंड आनंदी आहे.” अशी पोस्ट शेअर करत नेहा शितोळेने आपला आनंद व्यक्त आहे.
दरम्यान, ‘कल्की 2898 एडी’ चित्रपटात प्रभास, अमिताभ बच्चन, कमल हासन, दीपिका पदुकोण, दिशा पटानी, पशुपती आणि राजेंद्र प्रसाद असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत. संतोष नारायणन यांनी चित्रपटाला संगीत दिलं असून अश्विनी दत्त यांच्या वैजयंती मुव्हीजच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.