मुंबईकरांवर अखेर वरुणराजा प्रसन्न!

मुंबई-ठाणे मुसळधार पावसाची हजेरी

    05-Jul-2024
Total Views |

पाऊस
 
मुंबई :जुलै महिना आला तरी अद्याप मुंबईमध्ये वरुणराजाचे आगमन म्हणावे तसे झालेले नाही . त्यामुळे मुंबईकर उकाड्याने प्रचंड हैराण झाले आहेत . परंतू काल मुंबईमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली होती . आणि आज देखील मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे , मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये देखील मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर पुणे आणि कोल्हापुरात अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात वादळी वाऱ्यासह तुफान पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
 
मुंबई-ठाणे दोन दिवस मुसळधार पाऊस :
मुंबई शहर आणि उपनगरांसह ठाणे, जिल्ह्यात दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे . तसेच ताशी ४० ते ४५ वेगाने वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यानुसार पुढच्या काही तासांतच मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात होऊ शकते.
 
दरम्यान नवी मुंबई, ठाणे , भिवंडी, पालघर या परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. त्यामुळे नागरिकांनी काम असेल तरचं घराबाहेर पडावे असे अव्हाहन शासनाने केले आहे. आणि राज्यात अनेक ठिकाणी जारदार पाऊस बरसत आहे .त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून चांगलाच दिलासा मिळाला आहे.