‘मेट्रो-3’ स्थानकांची कामे अंतिम टप्प्यात

    05-Jul-2024
Total Views |

mero
 
मुंबई : मुंबईतील पहिल्या भूमिगत ‘मेट्रो-3’ (अ‍ॅक्वा लाइन) च्या पहिल्या टप्प्यातील कामे आता अंतिम टप्प्यात आहे. रिसर्च डिझाईन्स अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन (आरडीएसओ) ची चाचणी पूर्ण करून आता ‘मेट्रो-3’ रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या मंजुरीसाठी चाचण्या घेत आहे.
 
याच पार्श्वभूमीवर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल)च्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी स्थानकांवर पाहणी केली. सोमवार, दि. 1 रोजी भिडे यांनी सिद्धिविनायक आणि शीतलादेवी स्थानकाला भेट दिली.