'तौबा तौबा' गाणं पाहून सलमान खान झाला विकी कौशलचा फॅन

    05-Jul-2024
Total Views |
 
salman khan
 
 
मुंबई : अभिनेता विकी कौशल याची प्रमुख भूमिका असणारा बॅड न्यूज हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील एक गाणं विशेष गाजत आहे. तौबा तौबा असे या गाण्याचे बोल असून चक्क त्याच्या डान्सचा सलमान खान देखील फॅन झाला आहे.
 
विकी कौशलचा डान्स पाहून सलमान खानदेखील आश्चर्यचकित झाला असून त्याने विकीचं एको पोस्टच्या माध्यमातून कौतुक केलं आहे. सलमानने स्टोरी शेअर करत लिहिले आहे की, "विकी डान्स मुव्ह्स कमाल आहेत. गाणं पण खूप छान वाटतंय. खूप साऱ्या शुभेच्छा", असं सलमानने स्टोरीमध्ये म्हटलं आहे. सलमानने केलेलं कौतुक पाहून विकीचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. ही स्टोरी शेअर करत त्याने सलमानचे आभार मानले आहेत. "सो स्वीट ऑफ यू सलमान सर...थँक यू सो मच. माझ्यासाठी आणि टीमसाठी याचं खूप मोल आहे," असं विकीने म्हटलं आहे.
 
दरम्यान, विकी कौशलच्या 'बॅडन्यूज' सिनेमात अभिनेत्री तृप्ती डिमरी आणि अमी विर्क मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन आनंद तिवारी यांनी केलं आहे. १९ जुलैला हा विकी कौशलचा हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.