"तंटा नाय तर घंटा नाय..."; रितेश देशमुखच्या 'बिग बॉस मराठी ५' चा नवा प्रोमो

    05-Jul-2024
Total Views |

Ritesh Deshmukh 
 
मुंबई : लोकप्रिय कार्यक्रम बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सवकरच भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे यावेळी सीझनचा होस्ट अभिनेता रितेश देशमुख असणार आहे. आता 'बिग बॉस मराठी ५' नव्या पर्वाचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या नव्या प्रोमोत रितेशचा झक्कास अंदाज दिसत असून त्याची 'लयभारी' स्टाईलही पाहायला मिळत आहे.
 
'बिग बॉस मराठी ५' च्या नव्या प्रोमोमध्ये रितेशचा कमाल स्वॅग पाहायला मिळत आहे. 'बिग बॉस'च्या घरात आतापर्यंत ज्या पद्धतीने गेम प्लॅन, टास्क स्पर्धक खेळले त्यांना आता या नव्या पर्वात खेळता येणार नाही. कारण स्पर्धकांचे प्लॅन तोडायला रितेश सज्ज झाला आहे. प्रोमोमध्ये रितेश म्हणतो, "तंटा नाय तर घंटा नाय... ते प्लॅन बनवणार आणि मी तोडणार.. कारण आता मी आलोय कल्ला तर होणारच... तो पण माझ्या स्टाईलने" अशाप्रकारे रितेशचा भन्नाट अंदाज पाहायला मिळत आहे.
 

Ritesh Deshmukh 
 
दरम्यान, 'बिग बॉस मराठी ५' लवकरच महाराष्ट्रात लवकरच 'बिग बॉस'चा आवाज घुमणार आहे. 'बिग बॉस' मराठीचा नवा सीझन प्रेक्षकांना लवकरच कलर्स मराठी आणि JioCinema वर पाहता येईल. अद्याप कधीपासून सीझन पाहता येईल त्याची तारीख गुलदस्त्यातच ठेवली आहे.