लव्ह जिहाद! अज्जू बनून आझम ने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार; व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी

    05-Jul-2024
Total Views |
 LOVE JIHAD
 
डेहराडून : उत्तराखंडमधील डेहराडूनमध्ये लव्ह जिहादचे एक प्रकरण समोर आले आहे. येथे आझम नावाच्या मुलाने अज्जू अशी ओळख सांगून एका अल्पवयीन मुलीशी मैत्री केली आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्याआधारे एफआयआर नोंदवून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
 
एसएसपी अजय सिंह यांनी सांगितले की, दि. २ जुलै 2024 रोजी सहसपूर येथे राहणारी अल्पवयीन मुलगी पोलिसांकडे पोहोचली. तिने अज्जू उर्फ आझम याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रारीत तिने सांगितले की, २२०१७ मध्ये ती अल्पवयीन होती आणि इयत्ता ९वीत शिकत होती. त्याच काळात आझम (अज्जू) नावाच्या मुलाशी मैत्री झाली.
 
पीडितेने सांगितले की, २२ वर्षीय आझमने तिच्याशी मैत्री केल्यानंतर तिला डांबून ठेवले आणि तिच्यावर बलात्कार केला. यावेळी आझमने तिचा अश्लील व्हिडिओही बनवला. पीडितेचा आरोप आहे की, त्या व्हिडिओच्या आधारे आरोपी आझम तिच्यावर वारंवार बलात्कार करू लागला. तिने नकार दिल्यानंतर त्याने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
 
व्हीडिओ व्हायरल होण्याच्या भीतीने या प्रकरणी गप्प राहिल्याचे पीडितेने पोलिसांना सांगितले, मात्र यानंतर आरोपीचा त्रास वाढला. अखेर तरुणीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. तिने सहसपूर पोलीस ठाणे गाठून संपूर्ण घटना सांगितली. त्याआधारे पोलिसांनी आझमविरुद्ध गुन्हा दाखल केला.
 
याप्रकरणी सहसपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलिस निरीक्षक रश्मी रावत यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. खबऱ्याच्या माहितीवरून पोलिसांनी आरोपी आझम याला शंकरपूर येथील रुग्णालयाजवळून अटक केली. केदारवाला येथील रहिवासी जमशेद अली याचा तो मुलगा आहे. पोलिसांनी त्याच्या मोबाईलमधून अश्लील व्हिडिओ आणि फोटो जप्त केले आहेत. आरोपीची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.