जावेद अख्तर यांनी मुंबईत घेतलं आलिशान घर, किंमत तब्बल ‘इतके’ कोटी

    05-Jul-2024
Total Views |
 
javed
 
 
मुंबई : अभिनेता आमिर खान, अभिनेत्री तृप्ती डिमरी यांनी नुकतंच मुंबईत घर घेतलं होतं. या यादीत आता गीतकार जावेद अख्तर यांच्या नावाचा समावेश झाला आहे. जावेद अख्तर यांनीही मुंबईत जुहू येथे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता खरेदी केली आहे.
 
जावेद अख्तर अंदाजे १११.४३ स्क्वेअर मीटरचे एक रेडी-टू-मूव्ह-इन अपार्टमेंट विकत घेतले आहे. या अपार्टमेंटची किंमत ७.७६ कोटी रुपये आहे. दरम्यान,मुंबईतील जुहू या परिसरात संपुर्ण हिंदी चित्रपटसृष्टी वास्तव्य करते. या भागात अनेक सेलिब्रिटींची समुद्रकिनारी घरं आहेत. याच भागात आता जावेद अख्तर यांनी नवीन अपार्टमेंट घेतलं आहे. येथील सागर सम्राट इमारतीमध्ये हे अपार्टमेंट आहे.
 
जावेद अख्तर यांनी ११३.२० स्क्वेअर मीटरचे (१२१८.४७ स्क्वेअर फूट) एक अपार्टमेंट २०२१ मध्ये सात कोटी रुपयांना विकत घेतले होते. त्याच अपार्टमेंटजवळ त्यांनी हे नवीन अपार्टमेंट विकत घेतले आहे.