माझगाव डॅाकयार्डमध्ये नोकरीची सुवर्णसंधी!

माझगाव डॅाकयार्डमध्ये नोकरीसाठी भरती सुरु...

    05-Jul-2024
Total Views |

mazgav
 
मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे माझगाव डॅाक यार्डमध्ये अप्रेंटिस या पदासाठी एकूण ५१८ जागा शिकाऊ पदांसाठी आहेत. तर यासाठी शैक्षणिक पात्रता ही दहावी पास तसेच आठवीमध्ये ५० टक्के गुण मिळालेले उमेदवार ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करु शकतात.
 
२१ वयोगटातील उमेदवार देखील या भरती प्रक्रियेसाठी अर्ज भरु शकतात प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटींमध्ये सुट देण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना १०० रुपये फी भरावी लागणार आहे.नोकरीचे ठिकाण हे मुंबई असून उमेदवाराने आपला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने भरावा लागणार आहे.
 
तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही ८ जुलै २०२४ असून अर्जदारांना अधिक माहिती माझगाव डॅाक यांच्या अधिकृत वेबसाईटवर मिळेल. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सुचना आधी नीट वाचून घ्यावी आणि मगच भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा.