'हे' चार भारतीय जाणार अंतराळात; आकाश ते पाताळ सगळेकडे तिरंगा फडकवण्यासाठी शास्त्रज्ञ तयार

    05-Jul-2024
Total Views |
 gaganyaan
 
नवी दिल्ली : भारत २०२५ पर्यंत अंतराळात आणि खोल समुद्रात पहिली मानव मोहीम पाठविण्याची तयारी कर आहे. भारताच्या गगनयान या मानवी अंतराळ मोहिमेसाठी चार प्रवाशांची निवड करण्यात आली आहे. अशी माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) जितेंद्र सिंह यांनी गुरुवार, दि. ४ जुलै २०२४ ला दिली.
 
गगनयान मोहिमअतर्गंत अंतराळात जाणाऱ्यांमध्ये हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर, अजित कृष्णन आणि अंगद प्रताप आणि विंग कमांडर शुभांशु शुक्ला यांचा समावेश आहे. इस्रोच्या गगनयान मोहिमेचे उद्दिष्ट अंतराळात मानवासह तीन दिवसाचे मिशन पाठवायचे आहे. या मोहिमेतील यान अंतराळात ४०० किमी वर पृथ्वीला प्रदक्षिणा घालणार आहे.
  
अंतराळातील मोहिमेसोबतचं भारताने डीप-सी मिशन सुद्धा २०२५ मध्ये पूर्ण करण्याची तयारी केली आहे. या मोहिमेमध्ये पाणुबडी समुद्रयान तीन भारतीयांसह खोल समुद्रात जाईल. मत्स्य ६००० या उपक्रमातर्गंत समुद्रयान पाठवण्यात येणार आहे. हा पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचा एक उपक्रम आहे. यामध्ये हिंद महासागरा ६,००० मीटर खोलीवर एक मिशन पाठवण्यात येईल. यामध्ये तीन भारतीय सुद्धा खोल समुद्रात जातील.