रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने चिर्ले शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप

    05-Jul-2024
Total Views |

पनवेल
 
पनवेल : सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, कला, सांस्कृतिक, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने चिर्ले येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास भाजप महिला मोर्चाच्या उरण तालुका सरचिटणीस वर्षा प्रेमकुमार घरत, भाजप उरण तालुका चिटणीस राजन घरत, विनोद मढवी, सुभाष घरत, .आरती मढवी, हेमलता ठाकूर, ज्योत्सना माळी, संचित ठाकूर, शिक्षक दीपक पाटील हजर होते.
 
वर्षा घरत यांनी आपले विचार मांडताना सांगितले कि, गेले तीन दशकांपासून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्यावतीने गोर-गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते, तर उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थाना मंडळाकडून आर्थिक मदत केली जाते.
 
आपण या समाजात काम करत असताना आपल्या कमाईमधून काही तरी भाग आपण समाजोपयोगी कार्यासाठी लावला पाहिजे. या शाळेतील विद्यार्थी अभ्यासाप्रमाणे क्रीडा क्षेत्रात सुद्धा चांगले तालुका स्तरावर नाव कमावतात याचा मला अभिमान आहे. भविष्यात विद्यार्थ्यांना काहीही शिक्षणासंदर्भात मदत लागल्यास आमच्या परीने जी मदत करणे शक्य होईल ती मदत करण्याचा निश्चित प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी आश्वासित केले.