अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यात जस्टिन बीबर करणार परफॉर्म!

    04-Jul-2024
Total Views | 48
 
justin
 
 
मुंबई : सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लवकरच राधिका मर्चंट सोबत विवाह बंधनात अडकणार आहे. १२ जुलै २०२४ रोजी मुंबईतच त्यांचा शाही विवाह सोहळा संपन्न होणार असून विवाहापुर्वीच्या सोहळ्यांना सुरुवात झाली आहे. नुकताच राधिका आणि अनंत यांचा ‘मामेरु’ हा सोहळा संपन्न झाला असून यात अनेक बड्या कलाकारांनी देखील हजेरी लावली होती.
 
अनंत-राधिकाच्या लग्न सोहळ्यातील प्रत्येक तपशील जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असून या सोहळ्यासाठी जगभरातील पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. राधिका आणि अनंतच्या संगीत कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय पॉप सिंगर जस्टिन बीबर परफॉर्म करणार आहे. जस्टिन बीबर त्यासाठी मुंबईत दाखल झाला असून व्हिडिओ समोर आला आहे.
 

justin 
 
दरम्यान, मार्च महिन्यात जामनगरमध्ये प्रीवेडिंग कार्यक्रम तीन दिवसांसाठी आयोजित केला होता, ज्यात गायिका रिहाना हिने त्या सोहळ्यात चार चांद लावले होते. आता विवाह सोहळ्यातील संगीत कार्यक्रमात जस्टिन बीबरच्या गाण्यांवर लोकं थिरकणार आहेत.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121