पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर; 'या' महत्त्वाच्या प्रकल्पांचे होणार भूमिपूजन

    04-Jul-2024
Total Views |

मोदी
 
मुंबई : नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान मोदींनी मुंबईत रोडशो आणि दादरच्या शीवतीर्थावर जाहीर सभा घेतली होती. त्यामुळे निकालानंतर मोदींचा हा पहिलाच दौरा आहे. १३ जुलै रोजी पंतप्रधान मोदी मुंबईत येणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या हस्ते राज्य सरकारचा महत्त्वकांशी असलेला गोरेगाव-मुलुंड लिंक रोड आणि बोरीवली-ठाणे लिंकरोड भुयारी मार्गांचे भूमिपूजन होणार आहे.
 
गोरेगाव मुलुंड भुयारी मार्ग हा ६,३०० कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. तर बोरीवली ठाणे भुयारी मार्ग हा ८४,०० कोटींचा प्रकल्प आहे. ऑरेंज गेट ते ग्रॅंड गेट रोड उन्नत मार्गांच्या प्रकल्पाचे देखील भूमीपूजन मोदीच करणार आहेत हा प्रकल्प ११७० कोटींचा आहे. राज्य सरकार आणि मुंबई पोलीस दलाकडून पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे.