‘कल्की २८९८ एडी’चा बॉक्स ऑफिसवर धमाका सुरुच; पार केला ३०० कोटींचा आकडा

    04-Jul-2024
Total Views |
 
Kalki 2898 AD
 
 
 
मुंबई : नाग अश्विन दिग्दर्शित साय-फाय चित्रपट ‘कल्की २८९८ एडी’ या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावले आहे. कलियुगाचा भविष्यात होणारा अंत आणि त्यासाठी वाचवायला जन्म घेणाऱ्या कल्कीची कथा यात मांडण्यात आली आहे. अमिताभ बच्चन, कमल हासन, दीपिका पडूकोण आणि प्रभास यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. २७ जून रोजी पॅन इंडिया प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या सात दिवसांत ३०० कोटींचा टप्पा बॉक्स ऑफिसवर पार केला आहे.
 
 
 
पहिल्या दिवशी या चित्रपटाने तेलुगु भाषेत ६५.८ कोटी, तमिळ भाषेत ४.५ कोटी, हिंदी भाषेत २२.५ कोटी, कन्नड भाषेत ०.३ लाख आणि मल्याळम भाषेत २.२ कोटी कमवत एकूण ९५.३ कोटींची कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तेलुगू ३०.५५ कोटी, तमिळ ३.३ कोटी, हिंदी २३ कोटी, कन्नड ०.३५ लाख, मल्याळम २.१ कोटी कमवत एकूण ५९.३ कोटी कमावले. तिसऱ्या दिवशी तेलुगू ३२.३५ कोटी, तमिळ ५ कोटी, हिंदी २६ कोटी, कन्नड ०.४५ लाख, मल्याळम २.४ कोटी कमवत ६६.२ कोटी कमावले. आणि चौथ्या दिवशी तेलुगू ३८.८ कोटी, तमिळ ५.५ कोटी,हिंदी ४० कोटी, कन्नड ०.७ लाख, मल्याळम ३.२ कोटी कमवत ८८.२ कोटी कमावले. पाचव्या दिवशी तेलुगु १४.५ कोटी, तमिळ १.५ कोटी, हिंदी १६.५ कोटी, कन्नड ०.२५ लाख, मल्याळम १.३ कोटी कमवत एकूण ३४.१५ कोटी कमावले. सहाव्या दिवशी तेलुगु ११.३ कोटी, तमिळ १.३ कोटी, हिंदी १३ कोटी, कन्नड ०.२५ लाख, मल्याळम १.२ कोटी कमवत एकूण २७.०५ कोटी कमावले. तर सातव्या दिवशी तेलुगु ८.७५ कोटी, तमिळ १ कोटी, हिंदी ११.३ कोटी, कन्नड ०.२ लाख, मल्याळम १ कोटी कमवत एकूण २२.२५ कोटी कमावले. यानुसार सात दिवसांची कल्कीची एकूण कमाई ३९२.४५ कोटी झाली असून हिंदी भाषेत १५२.३ कोटी कमावले आहेत.