इंस्टाग्रामच्या माध्यमातून मुलींची फसवणूक! लाखोंचे दागिने लंपास; आरोपी मोहम्मद अजमल पोलिसांच्या ताब्यात

    04-Jul-2024
Total Views |
 Kerala Muhammad
 
कोची : केरळ पोलिसांनी थम्पिल मोहम्मद अजमल नावाच्या भामट्याला अटक केली आहे. २० वर्षांचा मोहम्मद अजमल हा मुलींना इंस्टाग्रामवर फसवून त्यांच्या सोन्याचे दागिने लुटायचा. आरोपी अजमल हा चामरावट्टम येथील रहिवासी आहे. त्याला वलनचेरी येथून अटक करण्यात आली आहे. पीडितेच्या नातेवाईकाच्या तक्रारीवरून आरोपीला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अजमल इंस्टाग्रामवर आपले टार्गेट सेट करायचा. येथे तो मुलींशी बोलून मैत्री करायचा आणि त्यांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करायचा. अजमलचे लक्ष्य बहुतेक दहावीत शिकणाऱ्या मुली होत्या. काही दिवसांच्या मैत्रीनंतर अजमल मुलींना भेटायला बोलवायचा.
 
आरोपी मोहम्मद अजमल हा भेटायला येणाऱ्या मुलींकडून नवीन दागिने करून देतो, असे सांगून दागिने घेत असे. दागिने हिसकावून घेतल्यानंतर अजमल मुलींशी मैत्री तोडून गायब व्हायचा. अजमलने अनेक मुलींसोबत असे कृत्य केल्याचे समजते. फसवणूक झाल्यानंतर एका पीडितेने तिच्या पालकांना संपूर्ण हकीकत सांगितली.
 
अखेर कल्पकंचेरी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. मोहम्मद अजमलने फसवणुकीला बळी पडलेल्या मुलींना कधीही आपला मोबाईल नंबर दिला नसल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यामुळे अजमलच्या शोधात पोलिसांना सुरुवातीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. फसवणुकीनंतर अजमलने सोशल मीडियाचा वापरही सावधगिरीने केला.
 
अजमलचा धूर्तपणा पाहून पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचला. पोलिसांनी तरुणीच्या नावाने बनावट इंस्टाग्राम प्रोफाइल तयार केले. या प्रोफाइलद्वारे अजमलशी संपर्क साधला. काही दिवसांनी अजमलने त्या आयडीवरून तरुणीशी आणि पोलिसांशी बोलणे सुरू केले. हे प्रकरण बैठकीपर्यंत पोहोचले. दरवेळी प्रमाणे यावेळीही अजमल मुलीला भेटायला बोलवले.
 
येथे पोलिसांनी त्याला अटक केली. अजमलने सांगितले की तो चोरीचे सोने त्याचा मित्र निफिक याला देत असे. निफिक आणि अजमल यांचीही सोशल मीडिया साइट इन्स्टाग्रामच्या माध्यमातून मैत्री झाली. निफिक हा चामरावट्टम येथील नरीपरंबिल येथील रहिवासी आहे. अजमलच्या अटकेनंतर तो फरार झाला. पोलिसांनी निफिकचा शोध सुरू केला आहे.