मुंबईत भरणार जगप्रसिद्ध शिल्पकाराच्या शिल्पांचे प्रदर्शन

    31-Jul-2024
Total Views |
shilp pradarshan 
प्रसिद्ध भारतीय शिल्पकार सदाशिव साठे यांच्या शिल्पांचे प्रदर्शन वरळीतील नेहरू सेंटर येथे भरणार आहे. डोंबिवलीतील शिल्पालय आर्ट सेंटरतर्फे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. १४ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट दरम्यान सकाळी ११ ते संध्याकाळी ७ या वेळेत हे प्रदर्शन नागरिकांना पाहता येणार आहे. सदाशिव साठे यांनी ६० वर्षात साकारलेली उत्तमोत्तम शिल्पे या प्रदर्शनात पाहता येणार आहेत.
 
शिल्पकार सदाशिव साठे हे जागतिक दर्जाचे शिल्पकार आहे. ऑल इंडियन स्कल्पचर्स असोसिएशनचे तए संस्थापकही होते. दिल्लीमधील महात्मा गांधींचे शिल्प त्यांनी साकारले आहे. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाही त्यांनीच साकारलेला आहे.