नाना शंकरशेट यांची पुण्यतिथी महानगरपालिकेत साजरी!

    31-Jul-2024
Total Views |
Jagannath Shankarseth Death anniversary
 
मुंबई : मुंबईचे आद्य शिल्पकार, जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापौर दालनातील त्यांच्या प्रतिमेस उप आयुक्त (पर्यावरण) मिनेश पिंपळे यांनी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने दि. ३१ जुलै रोजी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
 
यावेळी महानगरपालिका सचिव (प्रभारी) शुभांगी सावंत, अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष डॉ. गजानन रत्नपारखी, नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेंद्र शंकरशेट, सरचिटणीस मनमोहन चोणकर आणि चंद्रशेखर दाभोळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. तसेच एलफिस्टन महाविद्यालयात नाना शंकरशेट यांच्या तैलचित्राचे डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ . राजनिश कामत यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.