अहिल्यादेवी होळकर... 'सामान्य स्त्रीचा असामान्य जीवन प्रवास'

31 Jul 2024 15:49:34

Ahilyadevi Holkar Trishatabdi Program

मुंबई (प्रतिनिधी) :
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar) यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सव समितीतर्फे प्रबुद्ध मातृशक्ती परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन व आदर्श समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जोधपूर येथे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलो होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जोधपूरच्या माजी महाराणी साहिबा हेमलता राजे होत्या. त्यांनी आपल्या उद्बोधनातून राणी अहिल्यादेवी यांचा संघर्ष आणि योगदान अधोरेखित केले.

हे वाचलंत का? : भूस्खलनातील आपद्ग्रस्तांच्या मदतीला संघ स्वयंसेवक आले धावून

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी राणी अहिल्यादेवी यांचे प्रेरणादायी जीवन सर्वांसमोर मांडले. अहिल्यादेवींच्या जीवनाचे वर्णन करताना 'सामान्य स्त्रीचा असामान्य जीवन प्रवास' असे उद्गार काढले. पुढे ते म्हणाले, एका सामान्य कुटुंबातून राज्यावर राज्य करताना, त्यांनी भारतातील प्रसिद्ध मंदिरे आणि धार्मिक केंद्रे पुन्हा बांधली, ज्यामध्ये काशीचे विश्वनाथ मंदिर, रामेश्वरम, सोमनाथ, मणिकर्णिका घाट विशेष आहेत. अहिल्यादेवी एक कुशल प्रशासक आणि आर्थिक योजनाकार तसेच योद्धा होत्या.
Powered By Sangraha 9.0