अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदें यांची बदली!

31 Jul 2024 19:10:52

Shinde
 
मुंबई : मुंबई महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची मूळ जागी बदली करण्यात आली आहे. शिंदे मागील आठ वर्षांपासून प्रतिनियुक्तीवर असून हा कालावधी दि. २३ नोव्हेंबर २०२३ रोजी संपुष्टात आला. दरम्यान मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने शिंदेच्या प्रतिनियुक्तीचा कालावधी वाढवून न दिलेल्याने त्यांची मूळ जागी बदली करण्यात आली आहे. दि. ३१ जुलै २०२४ रोजी अतिरिक्त आयुक्त पदाचा आयुक्तांकडे सोपवून ते आपल्या मूळ विभागात परतले.
 
डॉ. सुधाकर शिंदे हे अंतर्गत महसूल सेवेतील अधिकारी असून दि. २४ नोव्हेंबर २०१५ पासून महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवर काम करत होते. पण आता सध्याचा कार्यभार मुंबई महापालिका आयुक्तांकडे सोपवून त्यांना आपल्या मूळ केडरमध्ये परतावे लागणार असल्याचे त्यांच्या बदली आदेशात म्हटले आहे. शिंदे यांनी आपल्या कारकीर्दीत निवासी डॉक्टरांच्या मानधनात दहा हजारांनी वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला होता. तसेच मुंबईत स्वच्छता अभियान आणि आरोग्य विभागाकडे त्यांचे विशेष लक्ष होते.
 
 
Powered By Sangraha 9.0