ब्रेकिंग! अखेर दाऊद शेखला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

30 Jul 2024 11:24:03
 
Yashashri Shinde & Dawood Sheikh
 
मुंबई : उरण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेख याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. दाऊदने यशश्री शिंदे या तरुणीची निर्घृणपणे हत्या केली होती. त्यानंतर तो फरार झाला होता. दरम्यान, आता त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. मंगळवारी सकाळी कर्नाटकमधून त्याला अटक करण्यात आली आहे.
 
दाऊदच्या अटकेनंतर उरण पोलिसांनी माध्यमांशी संवाद साधला. उरण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगलोरमध्ये आणि शाहपूर तालुक्यात पोलिसांच्या दोन टीम कार्यरत होत्या. आज सकाळी कर्नाटकमधून त्यांनी दाऊदला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
 
यशश्री आणि दाऊद हे दोघेही एकमेकांना ओळखत होते. त्या दोघांना एकदा भेटायचं होतं. या भेटीदरम्यान त्यांच्यात बोलणं झालं आणि ही घटना घडली, असे पोलिसांनी सांगितले. तसेच पीडितेचा चेहरा प्राण्यांनी खराब केल्याची शक्यताही पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे.
 
याप्रकरणात दोन-तीन संशयित असून त्यांचीही आही आम्ही चौकशी केली. परंतू, सध्या तरी दाऊद शेख हाच मुख्य आरोपी आहे. दाऊद शेख हा बरेच दिवस उरणमध्ये राहत होता. त्यानंतर त्याच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यावर तो कोरोनाकाळात कर्नाटकमध्ये गेला. तिथे तो ड्रायव्हर म्हणून काम करत होता, अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0