केरळमधील वायनाड येथे भूस्खलन!

30 Jul 2024 16:37:50

केरळ
 
नवी दिल्ली:केरळमधील वायनाडमध्ये मुसळधार पावसामुळे ३ ठिकाणी भूसस्खलन झाले. यामध्ये ४ गावे वाहून गेली आहेत. त्याचबरोबर घरं ,रस्ते आणि वाहने देखील वाहून गेली. तर ढिगाऱ्यांखाली दबून आतापर्यंत ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. ही अतिशय दुर्दैवी घटना सोमवारी रात्री २ वाजता घडली आहे.
 
दरम्यान या भूस्खलनामुळे काही लोक मृत्युमुखी पडले आहेत, तर शेकडो लोक बेपत्ता आहेत. येथील बचावकार्यासाठी एनडीआरएफ टीम , लष्कराचे जवान आणि हवाई दलाचे हॅलिकॅाटर, ड्रोन आणि श्वान पथके देखील सज्ज झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहूल गांधी , जेपी नड्डा, अमित शहा आणि मल्लिकार्जून खरगे यांनी या आपघातावर शोक व्यक्त केला आहे.
 
पाच वर्षांपूर्वी याच परिसरात वायनाडमधील मुड्डकाई , चुरमाला, आट्टामाला आणि नूलपूझा या चार गावांमध्ये भूस्खलन झाले होते. आणि हे भूस्खलन अतिवृष्टीमुळे झाले होते यामध्ये देखील 17 जणांचा मृत्यू झाला होता तर 5 जणांचा शोध अद्याप लागलेला नाही. वायनाडमध्ये आजही मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे आणि रेड अर्लट देखील जारी केला आहे. त्यामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होऊ शकतात.
 
 
 
Powered By Sangraha 9.0