हावडा- मुंबई एक्सप्रेसचा भीषण आपघात!

30 Jul 2024 15:18:31

Hawda
 
रांची :हावड्यावरुन मुंबईकरीता रवाना होणाऱ्या एक्सप्रेसचा भीषण आपघात झाला आहे. यात ३ जणांचा मृत्यू आणि २० जण जखमी झाले आहेत. झारखंडच्या चक्रधरपूर विभागातील राजखरस्वान-बदाबांबो या स्थानकादरम्यान ट्रेनचे १८ डबे रुळावरुन घसरले.
 
दरम्यान हावडा- मुंबई एक्सप्रेस चक्रधरपूर विभागातील राजखरस्वान पश्चिम आऊटर आणि बरांबू येथील रुळावरुन घसरली. तर हावडा -मुंबई एक्सप्रेस रुळावरुन घसरल्यानंतर रेल्वेने हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. बोगी रुळावरुन घसरल्यामुळे प्रवाशांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
अपघातानंतर पोलिस प्रशासनाने मदत आणि बचावकार्य सुरु केले. तर जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयातदेखील दाखल करण्यात आले. हावडा- मुंबई एक्सप्रेस मालगाडीच्या डब्यांना धडकली आणि ८ ते १० बोगी रुळांवरुन घसरल्या. यातील काही डबे एकमेकांवर आदळले तर काही डबे रस्त्याच्या कडेला पडले आहेत.
 
Powered By Sangraha 9.0