अर्थसंकल्पातून हरित उर्जा क्षेत्राला मोठ्या अपेक्षा; कंपन्यांना 'या' गोष्टींची आशा!

    03-Jul-2024
Total Views |
budget green energy sector


नवी दिल्ली :   
   देशात हरित ऊर्जेचा अवलंब वेगवान होत असताना उर्जा क्षेत्राला आगामी केंद्रीय अर्थसंकल्पातून अधिक धोरणात्मक समर्थन आणि कर लाभांची अपेक्षा आहे. या क्षेत्राशी संबंधित कंपन्यांचे कार्यकारी अधिकारी जीएसटी दरांमध्ये बदल आणि अक्षय ऊर्जेच्या पुरवठा साखळीतील प्रकल्पांसाठी आर्थिक सहाय्य, ग्रीन हायड्रोजन, ऑफशोअर विंड यांसारख्या इतर नवीन क्षेत्रांची अपेक्षा करत आहेत.
हिरो फ्युचर एनर्जीजचे जागतिक कार्यकारी अधिकारी श्रीवत्सन अय्यर म्हणाले की, हरित ऊर्जा उद्योग अक्षय ऊर्जा घटकांवरील जीएसटी दर कमी करण्याची अपेक्षा आहे. सौर मॉड्युल्स, विंड टर्बाइन आणि इलेक्ट्रोलायझर्सवरील जीएसटीचा सध्याचा दर पाच टक्क्यांपर्यंत कमी केल्याने प्रकल्पांची किंमत कमी होईल आणि देशभरातील ग्राहकांसाठी अक्षय ऊर्जा आणि हायड्रोजनची किंमत कमी होईल, असेही अय्यर म्हणाले.

आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत विविध क्षेत्रांनी आवाज उठविला असून निधीची मागणी तर काहींनी करात सवलत मागितली आहे. दरम्यान, हरित ऊर्जा क्षेत्राला आगामी केंद्रीय अर्थसंकल्पातून धोरणात्मक समर्थन आणि कर लाभांची अपेक्षा आहे. सौर सेल आणि मॉड्यूल्स आणि ग्रीन हायड्रोजनशी संबंधित प्रकल्पांवरील सीमा शुल्क कमी केल्याने सौर प्रकल्पांची आर्थिक व्यवहार्यता वाढेल, असा विश्वास कंपन्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे.