बँक निफ्टी ९२१.१५ अंकांनी वधारला; 'या' बँकेच्या शेअर्समध्ये घसघशीत वाढ!

    03-Jul-2024
Total Views |
bank nifty hdfc bank


मुंबई :     
  बॉम्बे स्टॉक एक्सचेंज निर्देशांक सेन्सेक्सने ८० हजारांचा टप्पा जवळपास ओलांडला आहे. या उच्चांकी पातळीसह बँकिंग क्षेत्रात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. विशेष म्हणजे बँकिंग क्षेत्रात खाजगी बँकांच्या समभाग प्रचंड वाढ नोंदवली आहे. विशेष म्हणजे बँकेतील विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांचे शेअरहोल्डिं जून तिमाहीत ५५ टक्क्यांनी खाली घसरले आहे.


हे वाचलंत का? -    सेन्सेक्स बिग मुव्हमेंटसह सुसाट ; आगामी काळात ८७ हजारांचा उच्चांक?


दरम्यान, देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकपैकी एक असलेली एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली आहे. आज मार्केटमधील चढ-उतारानंतर एचडीएफसी बँक प्रति शेअर १७६८ रुपयांवर स्थिरावला आहे. एफपीआय शेअरहोल्डिंग जून तिमाहीत ५५ टक्क्यांच्या खाली घसरले असून आज बाजार उघडताच एचडीएफसी बँकेच्या शेअर्सने उसळी मारल्याचे दिसून आले आहे.

दि. ०२ जुलै रोजी मार्केट बंद होताना एचडीएफसी बँकेचा प्रति शेअर १,७३०.६० रुपयांवर स्थिरावला तर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच दि. ०३ जुलै रोजी १,७९१ रुपये प्रति शेअर ३८.०५(२.२० टक्के) वाढीसह बंद झाला आहे. दरम्यान, एचडीएफसी बँकेच्या शेअर्सने मागील एका वर्षाच्या कालावधीत जवळपास ४ टक्क्यांनी १,७९१ रुपयांपर्यंत विक्रमी झेप घेतली आहे.