‘कल्की’ पाहिल्यानंतर रणवीर म्हणाला, “दीपिका त्या प्रत्येक क्षणात मार्मिकता..”

    03-Jul-2024
Total Views |
 
Kalki 2898 AD
 
 
मुंबई : ‘कल्की २८९८ एडी’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून यशस्वीपणे त्याने हिंदी, तमिळ आणि अन्य भाषांमध्ये ५०० कोटी कमावले आहेत. नुकताच अभिनेता रणवीर सिंहने आता कल्की २८९८ एडी हा चित्रपट पाहिल्यानंतर पत्नी दीपिकाचे कौतुक केले आहे.
 
चित्रपट पाहून झाल्यानंतर रणवीरने सोशल मिडियावर पोस्ट करत लिहिले आहे की, ‘कल्की २८९८ एडी हा उत्तम चित्रपट आहे. मोठ्या पडद्यावरच्या चित्रपटाचे ‘कल्की २८९८ एडी’ उत्तम उदाहरण आहे. चित्रपटात तांत्रिक भागावर ज्या कौशल्याने काम केले आहे, ते अविश्वसनीय आहे. भारतीय चित्रपटांतील हा अत्यंत उच्च दर्जाचा चित्रपट आहे. नागी सर आणि संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन!
 

Kalki 
 
तसेच रणवीरने प्रभास, कमल हासन व अमिताभ बच्चन यांचेदेखील कौतुक केले आहे. प्रभासने आपल्या अभिनयाद्वारे भूमिकेला न्याय दिल्याचे त्याने म्हटले असून कमल हासन यांना कायम सर्वोत्तम असणारा अभिनेता म्हटले आहे. तर अमिताभ बच्चन यांच्याबद्दल खास ओळी लिहिल्या आहेत. त्याने म्हटले आहे की, तुम्हीदेखील माझ्यासारखे अमिताभ बच्चन यांचे चाहते असाल, तर हा चित्रपट तुम्ही नक्कीच बघा. दीपिकाबद्दल लिहिता तो पुढे म्हणाला, “दीपिका, तू तुझ्या प्रतिभेने चित्रपटातील भूमिकेची उंची वर नेली आहेस. त्या प्रत्येक क्षणात मार्मिकता, काव्यमयता व शक्ती आहे. तू तुलनेच्या पलीकडे आहेस. खूप प्रेम!”