पंढपूरला निघालेल्या वाहनांना पथकारातून सूट

राज्य सरकारकडून शासन निर्णय जारी

    03-Jul-2024
Total Views |

pandharpur


मुंबई, दि.३ : 
पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या, भाविक व वारकऱ्यांना पंढरपूरला जातेवेळी व परत पंढरपूरहुन घेतेवेळी दि.०३ जुलै २०२४ ते दि.२१ जुलै २०२४ या कालावधीत पथकारातून सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. ही सवलत पालख्या, भाविक व वारकऱ्यांच्या हलक्या जड व वाहनांसाठीच असेल अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, पालखी वाहने आणि वारकऱ्यांच्या वाहनांना "आषाढी एकादशी २०२४", गाडी क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर नमूद करुन आवश्यक त्या संख्येनुसार स्टीकर्स परिवहन विभाग, वाहतूक पोलीस / पोलीस, संबंधीत आर.टी.ओ यांचेशी समन्वय साधून पोलीस स्टेशन्स, वाहतूक पोलीरा चौक्या य आर.टी.ओ ऑफीसेस मध्ये उपलब्ध करुन द्यावेत. तसे स्टीकर्स / पास वर नमूद करण्यात यावे. हे पास परतीच्या प्रवासाकरिता ग्राह्य धरण्यात येतील याप्रमाणे स्टीकर्स तयार करण्यात यावेत, असे आदेश राज्याचे मुख्यमंत्री यांनी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना गृह विभागामार्फत अवगत करण्याबाबत सुचना दिल्या आहेत.
राज्यभरातून पंढरपूरकडे येणारे सर्व पथकर नाक्यांवर या कालावधीत पथकर माफी नसलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना पथकरातून सुट द्यावी असा निर्णयही घेण्यात आला आहे. याबरोबरच पथकर नाक्यांवर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी जास्तीत जास्त मनुष्यबळ, ट्रॅफीक वार्डन व हँड होल्डींग मशीन ठेवण्यात यावेत, ज्यामुळे या कालावधीत पथकर नाक्यांवर वाहतुक कोंडी होणार नाही, याबाबत सर्व संबंधित महामार्ग प्राधिकारी, पथकर कंत्राटदार यांनी कार्यवाही करण्याचे निर्देश राज्य सरकराने दिले आहेत. तसेच , पोलीस व परिवहन विभागाने आषाढी एकादशीच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती जनतेस होण्याकरिता आवश्यकतेप्रमाणे जाहीर करावी.
महाराष्ट्र राज्यभरातून पंढरपूरला जाणारे रस्ते
मुंबई मधील सायन ते पनवेल महामार्ग, मुंबई- पुणे- सातारा - कोल्हापूर ते पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग, पुणे-सोलापूर, पुणे- राज्यसिमेपर्यंतचा महामार्ग इ. महामार्ग तसेच मुंबई-पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग व मुंबई-पुणे-सोलापूर राष्ट्रीय मार्गाला जोडणारे नवीन राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्ग, ग्रामिण रस्ते इ. या सर्वांचे खड्डे भरणे, दुरुस्ती कामे, सुचना फलके लावणे इत्यादी कार्यवाही त्या त्या कार्यान्वयीन यंत्रणांनी करावी. या कालावधीत रस्ता सुस्थितीत आणण्याची कामे राष्ट्रीय महामार्ग विभाग व NHAI ने तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. यासोबतच, दर २०-२५ कि.मी. अंतरावर पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग इ. यंत्रणांनी संयुक्तिक रुग्णवाहीका, रस्ते खड्डे भरण्यासंबंधी गटेरीअल, क्रेन इ. व्यवस्था ठेवावी. तसेच बऱ्याच महामार्गावर रस्ते सुधारण्याचे काम प्रगती पथावर आहेत, अशा कामांवर वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सर्व संबंधित महामार्ग प्राधिकाऱ्यांनी आवश्यक ती उपाययोजना करावी.