राम चरणची पहिली निर्मिती असणाऱ्या ‘द इंडिया हाऊस’च्या शुटींगला सुरुवात, गणरायाचा घेतला आर्शिवाद

    03-Jul-2024
Total Views |
 
ram charan
 
 
मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार राम चरण यांनी आरआरआर चित्रपटामुळे संपूर्ण जगाला वेड लावलं. आता मात्र ते अभिनेता नव्हे तर निर्मिगणती क्षेत्रात नशीब आजमावताना दिसत असून त्यांची पहिली निर्मिती असलेला द इंडिया हाऊस या चित्रपटाचे शुटींग सुरु झाले असून त्यापुर्वी चित्रपटाच्या संपूर्ण टीमने गणरायाचा आर्शिवाद घेतला आहे. हम्पीच्या विरुपक्ष मंदिरात टीमने देवाची पुजा करत हत्तीचा आर्शिवाद घेतला आहे.
 
 
 
द इंडिया हाऊस या चित्रपटाची कथा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याभोवती फिरणारी असून त्यांच्या १४० व्या जयंती निमित्त या चित्रपटाचा घाट लेखक अभिषेक अग्रवाल, दिग्दर्शक राम वामसी कृष्णा, निर्माते राम चरण यांनी घातला आहे. या चित्रपटात निखिल सिद्धार्थ, अनुपम खेर, सई मांजरेकरसह अन्य बरेच कलाकार झळकणार आहेत.