दक्षिण मुंबईतील सर्वात मोठ्या पुनर्विकास प्रकल्पाला गती

कामाठीपुरा पुनर्विकासात मिळणार ५००चौ.फुटांचे घर

    03-Jul-2024
Total Views |

kamathipura


मुंबई, दि.३ : विशेष प्रतिनिधी 
दक्षिण मुंबईतील बहुप्रतीक्षित कामाठीपुरा पुनर्विकासाला गती देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने मंगळवार दि.२ रोजी कामाठीपुरा येथील मोडकळीस आलेल्या उपकर आणि विना उपकर इमारतींच्या पुनर्विकासाचा एक भाग म्हणून जमीन मालकांसाठी भरपाई योजना जाहीर केली.

सरकारने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, जमीन मालकास ५० चौ.मी. ते २०० चौ. मीटर भूखंड असणाऱ्या जमीनमालकांना प्रत्येक ५० चौ. मीटरसाठी किमान ५०० चौरस फुटाचे घरे देण्याचा शासन निर्णय जारी केला आहे. २०० चौरस मीटरपेक्षा जास्त भूखंडांसाठी, प्रत्येक अतिरिक्त ५० चौरस मीटर क्षेत्रफळासाठी अतिरिक्त ५०० चौरस फूट घरे दिली जातील. गृहनिर्माण विभागाच्या सचिवांच्या देखरेखीखाली राज्य सरकारने स्थापन केलेल्या उच्चाधिकार समितीने हा निर्णय घेतला आहे. दक्षिण मुंबईच्या मध्यभागी वसलेले कामाठीपुराला २०० वर्षांचा अनोखा इतिहास आहे. हा परिसर मूळतः आंध्र प्रदेशातील तेलुगू भाषिक स्थलांतरित मजुरांनी स्थायिक केला होता, त्यामुळे या भागाला कामठी, म्हणजे "कामगार" म्हणून ओळखले जाऊ लागले. म्हाडा इमारत दुरुस्ती मंडळाने कामाठीपुराचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे आणि प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार केला.

समूह पुनर्विकासाच्या अनुषंगाने जमिन मालकास द्यावयाच्या मोबदल्याबाबत म्हाडाने प्रस्तावित केल्यानुसार व कामाठीपुरा विकास समितीने मागणी केल्यानुसार उच्चाधिकार समितीने दि.०६.०३.२०२४ रोजीच्या बैठकीमध्ये दिलेल्या मंजुरीनुसार कामाठीपुरा क्षेत्रातील जमिन मालकास खालीलप्रमाणे मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा अहवाल राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला. त्यानंतर नोव्हेंबर २०२३मध्ये उच्चस्तरीय समितीने या प्रकल्पाला मंजुरी दिली. मंजुरी मिळाल्यानंतर बोर्डाने सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी निविदा काढली आहे. विशेष म्हणजे दक्षिण मुंबईत वसलेले कामाठीपुरा ७७.९४५.२९ चौरस मीटरमध्ये विस्तारलेले असून येथे सुमारे ४७५ इमारती आहेत. मात्र त्याची अवस्था आता बिकट आहे. त्यामुळे त्याचा पुनर्विकास करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती.


७३४ जुन्या, मोडकळीस आलेल्या इमारती

जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त व बिगर उपकर प्राप्त अशा सुमारे ७३४ इमारती आहेत. या इमारतींमध्ये सुमारे ६ हजार ७३ निवासी आणि १ हजार ३४२ अनिवासी गाळे आहेत. या इमारती १०० वर्षांपेक्षा जुन्या असून, त्यामध्ये ३४९ बिगर उपकरप्राप्त इमारतींचा समावेश आहे. यात १४ धार्मिक वास्तू, दोन शाळा, चार आरक्षित भूखंड आहेत. शिवाय म्हाडाने बांधलेल्या ११ पुनर्रचित इमारती आहेत.


 अनुक्रमांक                       जमिन मालकाचे          मोबदला
                                               क्षेत्रफळ               सदनिका
                           
१. ५० चौ.मी.                            ५०० चौ.फु.       ०१ सदनिका
२. ५१ चौ.मी. ते १०० चौ.मी.        ५०० चौ.फु.       ०२ सदनिका
३. १०१ चौ.मी. ते १५० चौ.मी.       ५०० चौ.फु.       ०३ सदनिका
४. १५१ चौ.मी. ते २०० चौ.मी        ५०० चौ.फु.       ०४ सदनिका
५. २०० चौ.मी. भुखंडाच्या पुढे
      प्रत्येक  ५० चौ.मी. भुखंड       ५०० चौ.फु.       ०१ अतिरिक्त
      क्षेत्रफळाकरीता सदनिका