शाहरुख खानच्या शिरपेचात मानाचा तुरा! 'या' इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार खास सन्मान

    03-Jul-2024
Total Views |

khan 
 
 
 
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत खऱ्या अर्थाने आपल्या अभिनयाच्या जोरावर आणि जिद्दीवर अढळ स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणजे शाहरुख खान. वयाची पन्नाशी पार केली असली तरी आजही शाहरुख प्रेक्षकांना रॉमेंटिक चित्रपटांमध्ये तितकाच आवडतो. शाहरुखचा चित्रपट म्हटला की बॉक्स ऑफिसरवर तुफान कमाई करणार हे समीकरण जुळलेलंच आहे. आणि त्याचमुळे आचवरच्या त्याच्या चित्रपटसृष्टीतील कामगिरीसाठी त्याचा विशेष सन्मान केला जाणार आहे.
 
शाहरुख खानचा जागतिक फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार सन्मान जगात मानाचा समजला जाणार ७७ वा लोकार्नो चित्रपट महोत्सवा लवकरच पार पडणार असून या फिल्म फेस्टिव्हलमध्ये ग्लोबल स्टार बनलेल्या शाहरुख खानचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. शाहरुखला ३२ वर्षांच्या त्याच्या कामगिरीबद्दल प्रतिष्ठित पारडो अल्ला कॅरीरा एस्कोना-लोकार्नो टूरिस्मो पुरस्काराने सन्मानित केले जाणार असून भारतीय चित्रपटसृष्टीतील विविध शैलीतील १०० हून अधिक चित्रपटांमध्ये योगदान दिल्याबद्दल शाहरुखला महोत्सवात लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड किंवा लेपर्ड अवॉर्डने सन्मानित केले जाईल.
 
 
 
दरम्यान, हा चित्रपट महोत्सव ऑगस्टमध्ये संपन्न होणार असून १० ऑगस्ट २०२४ रोजी संध्याकाळी पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. विशेष म्हणजे या महोत्सवात शाहरुख खानचा 'देवदास' हा चित्रपटही दाखवला जाणार आहे. यानंतर ११ ऑगस्ट रोजी शाहरुख लोकांशी संवाद देखील साधणार आहे. लोकार्नो फिल्म फेस्टिव्हल स्वित्झर्लंडमध्ये साजरा केला जातो.