Real estate investment : मागील तीन वर्षांत उच्चांकी पातळीवर, 'हे' शहर टॉपवर!

    03-Jul-2024
Total Views |
Real estate investment


नवी दिल्ली :     मागील तीन वर्षांच्या उच्चांकी पातळीवरील रिअल इस्टेट(Real estate) गुंतवणूक असल्याचे पाहायला मिळाले आहे. रिअल इस्टेट गुंतवणूक २०२४ च्या दुसऱ्या तिमाहीत २.५ बिलियन डॉलर इतकी तिमाही गुंतवणूक झाली आहे. तसेच, दुसऱ्या तिमाहीत रिअल इस्टेट गुंतवणुकीने वेग घेतला आहे. देशात बंगळुरूमध्ये सर्वाधिक ५६ टक्के गुंतवणूक निवासी मालमत्तांमध्ये दिसून आली आहे.

दरम्यान, रिअल इस्टेट क्षेत्रातील संस्थात्मक गुंवतणूक तीन वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. या गुंतवणुकीतील अर्ध्याहून अधिक गुंतवणूक औद्योगिक आणि गोदाम क्षेत्रातील होती तर विदेशी गुंतवणूकदारांचा वाटा तब्बल ८० टक्क्यांहून अधिक आहे. देशांतर्गत गुंतवणुकीचा विचार करता गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २.८ पट अधिक गुंतवणूक केली आहे.

जागतिक रिअल इस्टेट प्लॅटफॉर्म 'Colliers' च्या मते, दुसऱ्या तिमाहीत सर्वाधिक गुंतवणूक औद्योगिक व गोदाम क्षेत्रात १.५३ अब्ज डॉलर इतकी होती. एकूण गुंतवणुकीतील वाटा ६१ टक्के होता तर दुसऱ्या तिमाहीसह चालू आर्थिक वर्षात १० पट वाढ राहिली आहे. या दोन क्षेत्रांनंतर निवासी क्षेत्रात वार्षिक वाढीसह सुमारे ०.५४ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली आहे.

दुसऱ्या तिमाहीत एकूण गुंतवणुकीपैकी २३ टक्के गुंतवणूक दिल्ली-एनसीआर आणि बंगळुरुमध्ये झाली आहे. गुंतवणुकीमधील प्रमुख शहरांपैकी बंगळुरुमध्ये १६ टक्के समभागासह ०.४० अब्ज डॉलरची सर्वाधिक गुंतवणूक झाल्याचे दिसून आले आहे. बंगळुरुनंतर दिल्ली-एनसीआरमध्ये ७ टक्के वाटा तर चेन्नई(३३ दशलक्ष डॉलर) व मुंबई(६० दशलक्ष डॉलर) इतकी दिसून आली आहे.