हाथरस दुर्घटनाप्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून शोक व्यक्त

    03-Jul-2024
Total Views |

RSS Hathras

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (RSS on Hathras Case)
 उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यातील सिकंदरराव येथे मंगळवारी झालेल्या साकार हरी बाबा यांच्या सत्संगात मोठी दुर्घटना घडली. सत्संगाच्या समारोपादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ११६ जणांचा मृत्यु झाल्याची माहिती आहे. यात अनेक जण जखमीदेखील झाले आहेत. या प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ब्रज प्रांतच्या वतीने प्रांत संघचालक शशांक भाटिया, प्रांत कार्यवाह राज कुमार यांनी शोक व्यक्त केला आहे. ही अत्यंत दुःखद व हृदयद्रावक घटना असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच मृतांच्या आत्म्यास शांती व जखमी भक्त लवकरात लवकर बरे व्हावे याकरीता परमेश्वराकडे प्रार्थनाही केली आहे.