“मी सगळ्यात कुरुप अभिनेता”; नवाजुद्दीन सिद्दीकी असं का म्हणाले?

    03-Jul-2024
Total Views |

Nawazuddin Siddiqui 
 
 
मुंबई : आपल्या सहजतेने आणि हिंदी भाषेवरील प्रभूत्वामुळे प्रेक्षकांना आपल्या अभियाची भूरळ घालणारे अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी आजही सुपरहिट चित्रपट देतातच. हिंदी चित्रपटसृष्टीत घराणेशाही, बॉलिवूडमध्ये असलेलं वर्णभेदाचं वातावरण, वंशवाद हा काही नवा नाही. यातूनच नवाजुद्दीन यांच्यासारखे प्रतिभावान कलाकाराल मिळाले आहेत.
  
नवाजुद्दीन यांनी दिग्दर्शक प्रशांत भार्गव यांच्या 'पतंग'च्या माध्यमातून अभिनयाला सुरुवात केली. त्यानंतर ब्लॅक फ्राइडे, गैंग्स ऑफ वासेपुर, चंगेज, डुओलॉजी, रमन राघव अशा अनेक चित्रपटांमधून नवाजुद्दीन प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात राहिले. असं असूनही नवाजुद्दीन अनेकांना आकर्षक वाटत नाही. नुकत्याच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नवाजुद्दीन यांनी याबद्दल भाष्य केले आहे.
 
“काही लोकं आपल्या दिसण्याचा इतका तिरस्कार का करतात. हे एक न उमगलेले कोडे असल्याची भावना नवाजुद्दीननं व्यक्त केली आहे. कदाचित आपण तेवढेच कुरूप असू. जेव्हा मी स्वत:ला आरशात पाहतो तेव्हा मला हे जाणवलं आहे.
एवढा कुरूप चेहरा घेऊन आपण फिल्म इंडस्ट्रीमध्ये का आलो? असा प्रश्नदेखील आपल्याला पडल्याचं ते म्हणतात. पण हे सगळं बोलत असताना बॉलिवूडचे आभार मानायलाही विसरत नाही.