'कल्की २८९८ एडी' चा दुसरा भाग कधी प्रदर्शित होणार, निर्मात्यांनी केली मोठी घोषणा

    03-Jul-2024
Total Views |

Kalki 2898 AD 
 
 
 
मुंबई : महाभारतातील कुरुक्षेत्र युद्ध ते भविष्यात कलयुगाचा होणारा अंत आणि सर्व सजीवांचा जीव वाचवण्यासाठी जन्म घेणारा कल्की अवतार या कथनावर आधारित कल्की २८९८ एडी हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. नाग अश्विन दिग्दर्शित अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण, प्रभास अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाचा दुसरा भाग कधी येणार यासाठी चाहते वाट पाहात आहेत. आणि याबद्दलच चित्रपटाच्या निर्मात्यांनी मोठा खुलासा केला आहे.
 
'कल्कि २८९८ एडी' हा बिग बजेट चित्रपट २७ जून रोजी प्रदर्शित झाला. नाग अश्विन दिग्दर्शित हा साय-फाय चित्रपट अवघ्या ४ दिवसांत ५०० कोटी पार केले. आता या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून दीपिकाच्या पोटी जन्म घेणाऱ्या कल्की अवतारात कोणता अभिनेता असणार याची उत्सुकता लागली आहे. कारण, आधीच या चित्रपटात अमिताभ, कमल हासन आणि प्रभास हे दिग्गज कलाकार आहेत. आता यांच्यापेक्षा कोणता मोठा कलाकार असणार हे पाहण्यासाठी थोडं थांबावं लागणार आहे.
 
'कल्की २८९८ एडी' च्या दुसऱ्या भागाचे जवळपास ६० टक्के काम पुर्ण झाल्याचे निर्मात्यांनी सांगितले आहे. तर चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या कमल हसन यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, “चित्रपटाच्या दुसऱ्या भागात त्यांची भूमिका मोठी असणार आहे”.