मुंबई गुन्हे शाखेची शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या आरोपींवर धडक कारवाई!

    03-Jul-2024
Total Views |

Crime  
 
मुंबई: मुंबई गुन्हे शाखेला दि.३ जुलै रोजी एक व्यक्ती जुहू येथे शस्त्रास्त्रे पुरवण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेने त्वरित घटनास्थळी दाखल होत गुन्हे शाखेने आरोपीला अटक केली आहे. दरम्यान आरोपीकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि सात जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
 
आरोपींच्या चौकशीत अन्य दोन आरोपींची नावे उघड झाली. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ८ पिस्तूल आणि १३८ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ८ जुलैपर्यंत गुन्हे शाखेची कोठडी सुनावल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेने दिली आहे.