मुंबई : पित्त आणि पोटदुखीचा त्रास असल्याने महाराष्ट्राचे कृषीमंत्री मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सोमवारी शस्त्रक्रिया करण्यात आली. मुंबईच्या सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात त्यांच्या पित्ताशयाची शस्त्रक्रिया पार पडली. सततचे दौरे , सभा, कामकाज यामुळे त्यांच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्यांचा पोटदुखीचा त्रास अधिक वाढला. डॅा. अमित मायदेव यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया पार पडली.
धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर आणखी काही दिवस त्यांना डॅाक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. दरम्यान शस्त्रक्रिया झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडेंच्या तब्बेतीची फोनवरुन चौकशी करत काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तर आमदार पंकजा मुंडे आणि माजी खासदार प्रतिमा मुंडे यांनीही रुग्णालयात धनंजय मुंडे यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचापूस केली.