उरण : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या उरणच्या यशश्री शिंदे (वय 22) या तरुणीचा मृतदेह शनिवार, दि. 27 जुलै रोजी उरणच्या कोर्टनाका परिसरात पेट्रोलपंपाजवळ आढळून आला. यशश्री ‘लव्ह जिहाद’ला बळी पडली असून, तिच्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी संतप्त प्रतिक्रिया उरण परिसरातून उमटत आहे. दाऊद शेख नामक व्यक्तीने यशश्रीची हत्या केलाचा संशय तिच्या वडिलांनी व्यक्त केला आहे.
उरण शहरात एन.आय. स्कूलजवळ राहणारी यशश्री शिंदे गुरुवार, दि.25 जुलै रोजी सकाळी घराबाहेर पडली. परंतु, ती घरी परतलीच नाही. त्यामुळे ती बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या नातेवाइकांनी उरण पोलीस ठाण्यात नोंदविली होती. तिचा मृतदेह शनिवारी पहाटे कोर्टनाका परिसरात पेट्रोलपंपाजवळ छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला. उरण पोलिसांनी तिचा मृतदेह इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.
पोलिसांनीही संशयित आरोपी दाऊद शेख याचा शोध सुरू केला असून तो बंगळुरू येथे गेल्याचे समजले आहे. त्याला लवकरात लवकर ताब्यात घेतले जाईल. त्यानंतर या प्रकरणाचा सर्व उलगडा होईल. तोपर्यंत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी केले आहे. दरम्यान, हे अमानवी कृत्य करणार्या नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी यशश्रीच्या नातेवाइकांसह उरणकरांनी केली आहे.
यशश्रीचा खुनी दाऊद शेख या नराधमाला लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे. ‘लव्ह जिहाद’चे षड्यंत्र रचून हिंदू मुलीचे जीवन नरक बनवणार्याला फाशीची शिक्षा आणि त्याच्या घरावर बुलडोझर फिरवला पाहिजे. भारतीय नागरिक म्हणून त्याचा जगण्याचा हक्क परत घेतला पाहिजे. कठोरातील कठोर कारवाई झाल्याशिवाय ‘लव्ह जिहाद’च्या घटना थांबणार नाहीत. महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा आणणे गरजे आहे.
- योगिता साळवी, वक्ता, ‘माझे शहर, लव्ह जिहादमुक्त शहर अभियान’
महाराष्ट्रात धर्मांतरबंदीचा कायदा आणावा
दाऊद शेख या जिहाद्याने त्याच्यावर 2019 मध्ये दाखल झालेल्या एफआयआरचा डूख धरून यशश्री शिंदेची षड्यंत्र रचून क्रूर हत्या केली. हा शुद्ध ‘लव्ह जिहाद’चा प्रकार आहे. या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आरोपीला फाशीच्या तख्तापर्यंत पोहोचविण्यासाठी हिंदू बांधवांनी, उरणकरांनी एकत्र यायला हवे. हिंदू मुलींचे धर्मांतर करण्याच्या प्रयत्नातून ‘लव्ह जिहाद’च्या घटना घडवल्या जात आहेत. हे थांबवण्यासाठी महाराष्ट्रात धर्मांतर रोखण्याचा कायदा आणावा.
- मोहन पार्टे, जिल्हाध्यक्ष, विश्व हिंदू परिषद, रायगड