पॅरिस ऑलिम्पिक २०२४ : नेमबाज मनू भाकरने जिंकले कांस्यपदक!

28 Jul 2024 18:04:17
paris olympic manu bhaker air pistol


नवी दिल्ली :        पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील पहिले पदक मनू भाकरने जिंकले आहे. मनू भाकरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल या क्रीडा प्रकारात कांस्यपदक जिंकले. कोरयिन खेळाडूंविरुध्द झालेल्या स्पर्धेत भाकरने कडवी टक्कर दिली. परंतु, तिला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. दरम्यान, या स्पर्धेतील सुवर्ण आणि रौप्य अशी दोन्ही पदके दक्षिण कोरियाच्या खेळाडूंनी जिंकली आहेत.

दक्षिण कोरियाच्या खेळाडूने ऑलिम्पिक विक्रमासह सुवर्णपदक जिंकले आहे. मनू भाकरने अंतिम फेरीत २२१.७ गुणांसह कांस्यपदक पटकावले आहे. दरम्यान, मनू भाकर ही नेमबाजीत ऑलिम्पिक पदक जिंकणारी भारताची पहिली महिला खेळाडू ठरली आहे. एवढेच नाही तर त्याने नेमबाजीत भारताचा १२ वर्षांचा पदकांचा दुष्काळही संपवला. 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये गगन नारंग आणि विजय कुमार यांनी नेमबाजीत पदके जिंकली होती.





Powered By Sangraha 9.0