आयटीआर फाईलिंग अंतिम मुदत ३१ जुलैच; आयकर विभागाने दिला महत्त्वाचा सल्ला!
27-Jul-2024
Total Views |
मुंबई : केंद्र सरकारने अर्थसंकल्पात नवीन कर प्रणाली लागू करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार, तीन लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त असणार आहे. विशेष म्हणजे करदात्यांना येत्या ३१ जुलै आधीच आयटीआर फाईलिंग करावी लागणार आहे. याकरिता आर्थिक वर्ष २०२३-२४ करिता दि. ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता फेटाळण्यात येत आहे. दरम्यान, तुम्ही जर अद्याप कर भरला नसेल तर ५ हजार रुपयांचा दंड लागण्याची शक्यता आहे.
आयटीआर करण्याची अंतिम मुदत जवळ येत असल्याने अधिक प्रमाणात फाईलिंग करण्यात येत आहे. ३१ जुलै अंतिम मुदत असून करदात्यांकडे केवळ चार दिवसांचा अवधी उरला आहे. दरम्यान, आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दररोज तेरा लाख लोक आयटीआर फाईलिंग करत आहेत.
आयटीआर फाईलिंगकरिता अंतिम तारीख जवळ येत असताना आयकर विभागाकडून आवाहन करण्यात येत आहे. आयकर विभागाने म्हटले आहे की, आयटीआरच्या ई-फायलिंगची तारीख वाढविण्यासंदर्भात संदेश बातम्यांची क्लिपिंग सोशल मीडियावर व्हायरल होत असून ही फेक न्यूज आहे. करदात्यांना 'IncomeTaxIndia' च्या अधिकृत वेबसाइट/पोर्टलवरील अपडेट्स फॉलो करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.