सलग तिसऱ्यांदा अर्थव्यवस्थेत ७ टक्के वाढ; प्लंबिंग ऑफ गव्हर्नन्सला बळकटी
27-Jul-2024
Total Views |
मुंबई : केंद्र सरकारने अर्थसंकल्प सादर केला असून भारतीय अर्थव्यवस्थेस पूरक तरतूदी करण्यात आल्या आहेत. बजेट सादर करण्यापूर्वी आर्थिक पाहणी अहवाल प्रसिध्द करण्यात आला. या आर्थिक पाहणी अहवालानुसार सलग तिसऱ्या वर्षी अर्थव्यवस्थेत ७ टक्क्यांनी वाढ नोंदविण्यात आली आहे.
दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दि. २२ जुलै रोजी संसदेत आर्थिक सर्वेक्षण दस्तऐवज सादर केला. सर्वेक्षणानुसार, आर्थिक वर्ष २०२४ मध्ये भारताचा वास्तविक जीडीपी ८.२ टक्क्यांनी वाढला असून सलग तिसऱ्या वर्षी ७ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
या सर्वेक्षणात जागतिक स्तरावर संकटे असूनही भारतीय अर्थव्यवस्थेच्या एकूण स्थितीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. देशाचा सकल देशांतर्गत उत्पादन देशाचा आर्थिक वर्ष ८.२ टक्क्यांनी वाढला असून तिसऱ्या वर्षी ७ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवून स्थिर उपभोग मागणी आणि गुंतवणुकीची मागणी सुधारल्याने अर्थव्यवस्थेस गतिशीलता प्राप्त झाली आहे.
सरकारने नवीन भारतासाठी विकास धोरण आखले असून यामाध्यमातून लक्ष तळाशी असलेल्या सुधारणा आणि प्लंबिंग ऑफ गव्हर्नन्सला बळकट करण्याकडे अधिक भर दिला पाहिजे. याचा फायदा गेल्या दशकातील संरचनात्मक सुधारणा मजबूत, टिकाऊ, संतुलित आणि सर्वसमावेशक वाढ मिळवून देतील," असे अहवालात म्हटले आहे.