आशियाई विकास बँकेच्या अहवालात अर्थव्यवस्थेबाबत मोठे भाष्य
27-Jul-2024
Total Views |
नवी दिल्ली : भारताचा जीडीपी सकल देशांतर्गत उत्पादन वाढीसह यंदा अर्थव्यवस्थेत सात टक्के वाढीची अपेक्षा आहे. तसेच, सात टक्क्यांच्या वाढीस महागाई वाढ सरासरी ४.६ टक्के असेल, असे आशियाई विकास बँके(एडीबी)ने एशिया डेव्हलपमेंट आऊटलूक अहवालात म्हटले आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ करिता बँकेने आपला अंदाज कायम ठेवला असून आगामी वर्षात ७.२ टक्के वाढीसह किरकोळ किमतीत ४.५ टक्केस सरासरी वाढ होईल.
दरम्यान, केंद्राने आर्थिक वर्ष २०२४-२५ करिता अर्थसंकल्प सादर केला असून (एडीबी)ने सांगितले की, या प्रकल्पाने सरकारच्या लवचिक पुनर्वसन, पुनर्बांधणी आणि पुनर्प्राप्ती धोरणला देखील समर्थन दिले आहे. एकात्मिक आणि अनुक्रमिक दृष्टिकोनाचे पालन केले जाईल जेणेकरुन विविध क्षेत्रातील गुंतवणूक एकमेकांना पूरक होतील, असे मत अहवालात व्यक्त केले आहे. एकंदरीत, विकसनशील आशियातील अर्थस्थितीत ५ टक्क्याने वाढण्याचा अंदाज आहे.
बँकेने २०२४ मध्ये चीनसाठी ४.५% वाढीचा अंदाज देखील अपरिवर्तित ठेवला आहे. परंतु, देशासाठी महागाईचा अंदाज १.१ टक्क्यावरून ०.५ टक्क्यापर्यंत कमी केला आहे. एकूणातच, एप्रिलमध्ये अंदाजित ४.९ टक्क्यांच्या तुलनेत विकसनशील आशिया आर्थिकवृध्दीत ५ टक्के वाढीचा अंदाज आहे, असे आशियाई विकास बँक(एडीबी)ने म्हटले आहे.