उद्धव ठाकरे भावी मुख्यमंत्री! हे पवार-काँग्रेसला मान्य आहे का?

    27-Jul-2024
Total Views |
 
Thackeray
 
मुंबई : उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात अनेकठिकाणी शुभेच्छांचे बॅनर लावण्यात आले आहेत. यावर उद्धव ठाकरेंचा 'भावी मुख्यमंत्री' असा उल्लेख करण्यात आला आहे. या बँनर्सची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे.
 
उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरात अकोला, बुलढाणा, पुणे, सांगली, हिंगोली अशा अनेक जिल्ह्यांमध्ये शिवसैनिकांकडून शुभेच्छांचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. या पोस्टर्सवर उद्धव ठाकरेंचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे.
 
हे वाचलंत का? -  लाडकी बहिण योजनेच्या खर्चावर मंत्री अदिती तटकरेंचा खुलासा, म्हणाल्या...
 
विधानसभा निवडणूका जवळ आल्याने अशा प्रकारच्या पोस्टरमुळे राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. उद्धव ठाकरे भावी मुख्यमंत्री असणं हे शरद पवार गट आणि काँग्रेसला मान्य आहे का? आणि मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंकडून महाविकास आघाडीवर दबाव टाकण्यात येणार का? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे.