गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा जिवघेणा कहर!

चांदीपुरा व्हायरमुळे ४८ मुलांचा मृत्यु

    27-Jul-2024
Total Views |

Chandipura
 
गांधीनगर : गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. या व्हायरसमुळे ४८ मुलांचा मृत्यु झाला आहे. तर १२७ नवीन प्रकरणे दाखल झाली आहेत. तर अनेकांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा व्हायरस गुजरात आणि राजस्थानमध्ये खुप मोठ्या प्रमाणात पसरत आहे.
 
चांदीपुरा व्हायरस हा विशेषत:१२ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांमध्ये आढळतो. तर हा व्हायरस अतिशय धोकादायक असून याची सुरुवात नागपुरातील चांदीपूर येथून झाली. आणि आता हा व्हायरस गुजरातमध्ये झपाट्याने वाढत आहे. चांदीपुरा व्हायरस लहान मुलांमध्ये पसरत आहे.
 
चांदीपुरा व्हायरच्या संसर्गाची ही आहेत लक्षणे : 
ताप
डोकेदुखी
अंगदुखी
जुलाब
उलट्या
शरीर आणि स्नायुंची वेदना
 
ही लक्षणे चांदीपुरा व्हायरची आहेत यामुळे गंभीर एन्सेफलायटीस देखील होतो. ही एक स्थिती आहे ज्यामुळे मेंदूला सूज येते. हा चांदीपुरा व्हायरस अतिशय धोकादायक व्हायसर आहे.