ठाण्यातही पावसाचे धुमशान - महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

    25-Jul-2024
Total Views | 41
thane city heavy rainfall


ठाणे :       ठाण्यात बुधवार रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गुरुवारी पहाटेपासुन चांगलेच धुमशान मारले. तलावांचे शहर असलेल्या ठाणे शहरातील तलाव भरले असुन अनेक सखल भागात पाण्याचे तळे साचल्याने जनजीवन विस्कळित झाले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ४८ वृक्षांची पडझड होऊन दोघेजण जखमी झाल्याच्या घटना घडल्या. यातील वृद्ध शशिकांत कर्णिक यांची प्रकृती गंभीर असल्याचे प्रशासनाने सांगितले. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी व्हीसी द्वारे परिस्थितीचा आढावा घेऊन प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना दिल्या.


धरणे तृप्त झाली

दमदार वर्षावाने ठाणे जिल्ह्यातील धरणे तृप्त झाली. भातसा या धरण क्षेत्रात आतापर्यंत 72.67 टक्के पाणी साठा तर मोडकसागर या धरणात 98.66 इतका तर तानसा धरणात 99.18 टक्के मध्य वैतरणाचा पाणी साठा 63.32 टक्के असून बारवी धरणाचा पाणी साठा 60.99 टक्के पाणी साठा झाला आहे. पावसाचा जोर सुरूच राहिला तर धरणे ओव्हर फ्लो होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


४८ वृक्ष धाराशाही

ठाणे मनपा आपत्ती व्यवस्थापन कक्षात दिवसभरात १०५ तक्रारींचे फोन खणखणले.तर सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळलेल्या पावसाने ४८ वृक्ष धराशाही झाले असुन दमाणी इस्टेट येथे राहणारे शशिकांत कर्णीक हे वृद्ध पादचारी वृक्ष कोसळल्याने गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर कौशल्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वृक्ष पडण्यासह १३ वृक्षांच्या फांद्या तुटल्या असून आठ वृक्ष आणि एक होर्डींग धोकादायक स्थितीत असल्याची माहिती प्रशासनाने दिली.


अग्रलेख
जरुर वाचा
मंदिर प्रवेशाबाबत जातीय भेदभाव थांबवा; मद्रास हायकोर्टाने स्थानिक प्रशासनावर दिली मोठी जबाबदारी

मंदिर प्रवेशाबाबत जातीय भेदभाव थांबवा; मद्रास हायकोर्टाने स्थानिक प्रशासनावर दिली मोठी जबाबदारी

कायद्याच्या राजवटीने शासित असलेल्या देशात जातीवर आधारित कोणताही भेदभाव मान्य नाही, असे गुरूवार दि.१७ जुलै रोजी मद्रास उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. अय्यनार मंदिरात अनुसूचित जाती प्रवर्गाच्या (एससी) भाविकांना अडविल्या प्रकरणी उच्च न्यायालयाने अरियालूर जिल्हा पोलिस अधीक्षकांना आणि उदयारपलयम महसूल अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत की, “पुथुकुडी येथील अय्यनार मंदिर प्रवेशासाठी अनुसूचित जाती प्रवर्गाच्या भाविकांना आडवू नये आणि त्यांना उत्सवात सहभागाची संपूर्ण मुभा दिली जावी.”..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121