जगातील सर्वात मोठ्या बोगद्याच्या कामास सुरूवात होणार
25-Jul-2024
Total Views |
नवी दिल्ली : भारताच्या इतिहासातील अभिमानास्पद ठरलेल्या कारगील युध्दाला २५ वर्ष पूर्ण होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर दि. २६ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी लडाखला भेट देणार आहेत. १९९९ च्या भारत-पाकिस्तान कारगील युध्दाला २५ वर्ष पूर्ण होणार असून स्मरणार्थ पंतप्रधान मोदी लडाखमधील कारगिल युद्ध स्मारकाला भेट देणार आहेत.
दरम्यान, २५ व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी लडाखला भेट देणार आहेत. १९९९ च्या युद्धात पाकिस्तानवर विजय प्राप्त केल्याच्या स्मरणार्थ पंतप्रधान मोदी कारगिल युद्ध स्मारकावर श्रद्धांजली अर्पण करतील. सकाळी ९:२० वाजता युध्द स्मारकाला भेट देतील आणि शहीदांना श्रद्धांजली अर्पण करतील, असे पंतप्रधान कार्यालयाकडून अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
याव्यतिरिक्त, पंतप्रधान या दौऱ्यात शिंकुन ला बोगदा प्रकल्पाच्या प्रारंभाकरिता पहिला स्फोट देखील करतील. सर्व हवामान कनेक्टिव्हिटी प्रदान करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प लेहला प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर हा जगातील सर्वात उंच बोगदा असेल, असे केंद्राने नमूद केले आहे.
शिंकुन ला टनेल प्रकल्प काय आहे?
निमू - पदम - दारचा रोडवर सुमारे १५,८०० फूट उंचीवर ४.१ किमी लांबीचा ट्विन-ट्यूब बोगदा बांधण्याचे प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. २९८-किलोमीटरचा निमू-पदम-दारचा रस्ता देशाकरिता एक सामरिक मालमत्ता आहे. याचे कारण तो मनाली-लेह आणि श्रीनगर-लेह यांच्या तुलनेत लहान असून डीजी बॉर्डर रोड लेफ्टनंट जनरल रघु श्रीनिवासन यांनी जानेवारीमध्ये सांगितले होते की, शिंकुन ला बोगद्याचे बांधकाम सुरू झाल्यानंतर, लडाखला तिसरा सर्व-हवामान अक्ष म्हणून स्थापित केला जाईल.