राज ठाकरेंनी फुंकले विधानसभेचे रणशिंग! 'इतक्या' जागा लढवणार

    25-Jul-2024
Total Views | 53
 
Raj Thackeray
 
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी विधानसभा निवडणूकीचे रणशिंग फुंकले आहे. वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी विधानसभेत स्वबळावर २५० जागा लढण्याची घोषणा केली आहे.
 
राज ठाकरे म्हणाले की, "निवडून येण्याची तयारी आणि क्षमता असणाऱ्या लोकांनाच तिकीटं दिली जातील. तिकीट मिळालं की, मी पैसे काढायला मोकळा, असं म्हणणाऱ्या कोणालाही तिकीट दिलं जाणार नाही. तुम्ही जे बोलाल, जे सांगाल आणि जी माहिती द्याल ती प्रामाणिकपणे द्या. कारण तुम्ही दिलेली माहितीही तपासली जाणार आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणूकीमध्ये मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लोक काहीही करून सत्तेत बसवायचे आहेत."
 
हे वाचलंत का? -  "लाडकी बहिण, लाडका भाऊ एकत्र राहिले असते तर पक्ष टिकला असता!"
 
"तुम्ही जे बोलाल, सांगाल, जी कोणतीही माहिती द्याल, ती माहिती नीट द्या. प्रामाणिकपणे द्या. तुम्ही दिलेली माहितीही चेक केली जाणार आहे. तुमच्यापर्यंत ही लोकं येतील. मग कोणती युती होईल का, आपल्याला कोणत्या जागा मिळतील, असा कोणताही विचार मनात आणू नका. जवळपास सव्वा दोनशे ते अडीचशे जागा आपण लढवणार आहोत. सर्व गोष्टी चेक करणार आहोत. आम्ही सगळेच तयारीला लागलो आहोत," असे ते म्हणाले. तसेच १ ऑगस्टपासून मी महाराष्ट्र दौरा सुरु करणार आहे, असे सांगत राज ठाकरेंनी सर्वांना निवडणूकीच्या तयारीला लागा, असे आवाहनही केले आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
सांस्कृतिक राष्ट्रकुलाचा विचार व्हायाला हवा : डॉ. विनय सहस्त्रबुद्धे

सांस्कृतिक राष्ट्रकुलाचा विचार व्हायाला हवा : डॉ. विनय सहस्त्रबुद्धे

“सध्याच्या काळातील संघर्ष बघता, सगळ्या घटनांकडे एका सांस्कृतिक दृष्टिकोनातून बघणे गरजेचे आहे. यासाठी सांस्कृतित राष्ट्रकुलाचा विचार व्हायाला हवा “ असे प्रतिपादन राज्यसभेचे माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले. दि. ४ ऑक्टोबर रोजी वैभव केळकर आणि डॉ. मेघना दलाल यांनी लिहिलेल्या आणि दिलीपराज प्रकाशन नें प्रकाशित केलेल्या "पार्थसूत्र" या मराठी आणि "Bow & Beyond" या इंग्लिश पुस्तकाचे प्रकाशन पुण्याच्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या भानुबाई नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे पार पडले. या कार्यक्र..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121