उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार पुण्याकडे रवाना

25 Jul 2024 13:28:26

Ajirt pawar
 
मुंबई : राज्यात मुंबई, पुणे ,ठाण्यासह मुसळधार पाऊस सुरु आहे. तर या पार्श्वभूमीवर मंत्रालयातून राज्यातील अतिवृष्टी आणि मदतकार्याचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री अजीत पवार पुणे येथे रवाना झाले. दरम्यान अजित पवार यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
 
तर पुणे शहर आणि जिल्ह्याच्या परिसरातच पावसाचा जोर वाढला आहे. रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे आणि खडकवासला धरणातून पावसाचा विसर्ग वाढल्यामुळे पुण्यातील अनेक भागांत पाणी साचलं आहे. त्यामुळे पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
 
पुणे शहर आणि जिल्ह्यातील आतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परिस्थितीचा आढावा घेत नागरीकांना सुचना दिल्या आहेत. तर अतिवृष्टी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या पुरस्थितीच्या पार्श्वभूमीवर ते स्वत: जिल्ह्यात उपस्थित राहून बचाव आणि मदतकाऱ्याचे नेतृत्व करणार आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0