आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका

24 Jul 2024 12:46:00

Anganwadi
 
मुंबई : आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार, अपघाती मृत्यू आल्यास दहा लाख आणि अपंगत्वासाठी पाच लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहेत. यासाठी प्रतिवर्षी अंदाजे 1 कोटी, 5 लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला.
 
हा निर्णय दि. 1 एप्रिल रोजीपासून लागू करण्यात येईल. सध्या 75 हजार, 578 एवढ्या स्वयंसेविका आणि 3 हजार, 622 गटप्रवर्तक कार्यरत असून त्या आरोग्यासंदर्भात महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळतात. हे करताना अपघाती मृत्यू आल्यास किंवा अपंगत्व आल्यास त्यांना आर्थिक साहाय्य व्हावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
 
Powered By Sangraha 9.0