ठाणे : ठाण्याच्या लोकमान्यनगर बस डेपो जवळ असलेल्या एका इसमांकडून आधार कार्ड, पॅन कार्ड, तसेच पासपोर्ट काढण्याकरता आवश्यक असलेले बनावट दस्तावेज बनवून पासपोर्ट मिळवला. त्याच पासपोर्टवर पाकिस्तानचा दौरा करणाऱ्या २३ वर्षीय मुस्लिम महिला नगमा नूर मकसूद अली उर्फ सनम खान हिच्यासह बनावट दस्तऐवज बनवणाऱ्या व्यक्ती विरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यामध्ये १९ जुलै, रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असुन केंद्रीय तपास यंत्रणांनीही याची गंभीर दखल घेतली आहे.
ठाण्याच्या लोकमान्य नगर पाडा नं ४ त्रिमूर्ती अपार्टमेंट येथे राहणाऱ्या २३ वर्षीय नगमा नूर मकसूद अली उर्फ सनम खान या महिलेने लोकमान्यनगर बस स्टॉप येथे असलेल्या एका इसमाच्या मदतीने आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पासपोर्ट बनविण्याकरिता आवश्यक असलेले दस्त बनावट बनवून पासपोर्ट मिळवला. सदर पासपोर्ट द्वारे पाकिस्तानचा व्हीसा मिळवून पाकिस्तानचा दौराही केल्याचे तपासात उघड झाले. पासपोर्ट बनविण्याकरिता वापरात आणलेले दस्तावेज हे बनावट असल्याचं समोर आल्यानंतर आरोपी नगमा अली उर्फ सनम खान हीचे बिंग फुटले आहे. याबाबत वर्तकनगर पोलिसांनी आरोपी नगमा आणि तिला बनावट दस्तऐवज तयार करण्यास मदत करणाऱ्या अनोळखी इसम अशा दोघांच्या विरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे.